मुंबई – ‘उद्धव ठाकरे हे टीका करत नाही, तर ते गरळ ओकत आहेत, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाने केलेली विकास कामे ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘गाव चलो’ अभियान सुरू करणार आहे. ‘गाव चलो’ अभियान 4 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. महायुतीच्या जागावाटपावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझी अद्यापही मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालेली नाही. मी, मुख्यमंत्री आणि अजित पवार आम्ही तिघे एकत्रित बसून रणनीती ठरवू आणि त्या आधारे काम करू. ‘गाव चलो’ अभियानअंतर्गत फडणवीस म्हणाले, यापूर्वी भाजपामध्ये ‘गाव चलो’ अभियान आणि ‘घर चलो’ अभियान राबविले होते. आता पुन्हा नव्याने आम्ही ते अभियन राबवणार आहोत. यावेळी देशातील रिकॉर्ड असेल की, कोणत्याही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते हे 100 टक्के गावापर्यंत पोहचतील आणि त्या गावात राहतील. यावेळी गावाच्या प्रगती आणि परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.