Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात जो विजय मिळाला, तो राष्ट्रीयत्त्वाचा विजय आहे. हे परबोर्तन नसून महापरिबोर्तन आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ममता बॅनर्जी यांना टोला लगावला. देशातील 5 राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर मुंबईसह देशभरात भाजप कार्यकत्र्यांनी जल्लोष केला असून महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांनी देखील आनंदोत्सव केला. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विजयबद्दल आनंद व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, मी जेव्हा बंगालमध्ये गेलो होतो, त्यावेळी एका पत्रकाराने मला विचारलं की, निवडणुकांवेळी ममता बॅनर्जी म्हणतात भाजपचे लोक हे पश्चिम बंगालच्या बाहेरचे आहेत. मात्र, मी पत्रकारांना सांगितले की, भाजपची स्थापना ज्यांनी केली ते श्यामाप्रसाद मुखर्जी हेच पश्चिम बंगालचे होते. त्यामुळे खऱ्या बंगालचा पक्ष कोणता असेल तर तो भाजप आहे. Devendra Fadnavis आज बंगलाच्या जनतेने दीदींना दाखवून दिले, बंगालचा खरा पक्ष कोणता आहे. बंगालच्या लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेऊन बंगालमध्ये परबोर्तन नाही, महापरीबर्तन करुन दाखवले, असे त्यांनी म्हटले. बंगाल, आसाम, पद्दुचेरीतील हा विजय भारतीयांचा मोदींवर असलेल्या विश्वासाचा हा विजय आहे. बंगालमधून कुशासन बाहेर काढण्याचे काम 30 वर्षे काँग्रेस, 36 वर्षे कम्युनिष्ट आणि या दोघांपेक्षाही खतरनाक 15 वर्षे ममता दीदीचे शासन होते. बंगालची अवस्था या सर्व राज्यकर्त्यांनी कमी करुन ठेवली, असे म्हणत आता परिवर्तन झाल्याचे फडणवीसांनी म्हटले.