2024 च्या निवडणुकीत भाजप महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता मिळवेल, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

मुंबई – सन 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता मिळवेल असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर आज विधानभवनाच्या परिसरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.
निकालांबद्दल फडणवीस म्हणाले की, लोकांच्या मनावर अजून मोदींची जादू कायम असून या जादूने बहुचर्चित अँटी-इन्कम्बन्सीला प्रो-इन्कम्बन्सीमध्ये बदलले आहे. फडणवीस यांच्याकडे पक्षाच्या गोवा शाखेची जबाबदारी होती. ते म्हणाले की आता महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन पहायचे आहे. भाजप 2024 मध्ये पूर्ण बहुमताने स्वतःचे सरकार स्थापन करेल असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, चार राज्यांतील निकालांनी पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील एकमेव मजबूत व लोकप्रिय नेते आहेत. उत्तर प्रदेशची लोकसंख्या 25 कोटी आहे आणि गेल्या 37 वर्षांत पहिल्यांदाच एका पक्षाने त्या राज्यात लागोपाठ दुसऱ्यांदा सत्ता राखली आहे. भाजपच्या पुढील ध्येयाबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले, “आता बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) हे आमचे लक्ष्य आहे.





