“मतदानाचा टक्का यावेळेला वाढेल अन्…” मतदानानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis । मागच्या एका महिन्यापासून राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु होती. सोमवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. तर आज बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्यातील २८८ मतदारसंघांमध्ये मतदान होत असून यावेळच्या मतदानाला किती प्रतिसाद मिळतो हे पाहाणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका शाळा, डीग दवाखाना, धरमपेठ, नागपूर येथे आई आणि पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि मतदारांना आहवान केले.
मतदान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. लोकशाहीचा उत्सव सुरु आहे. या उत्सवामध्ये मतदान हा केवळ आपला हक्क नाही. तर आपले कर्तव्य देखील आहे. म्हणून मी माझ्या कुटुंबासकट मतदानाचा हक्क बजावलेला आहे. महाराष्ट्रातील तमाम बंधू- भगिनींना मी सांगू इच्छितो की सर्वांनी मतदान करा.
#WATCH | Nagpur: Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis, says, “I appeal to everyone that the festival of democracy is going on and participation in democracy is very important. For those who have expectations from their government, it is even more important for them to come out… pic.twitter.com/Vhe8wu1mgL
— ANI (@ANI) November 20, 2024
मतदानाचा टक्का यावेळेला वाढेल, असे मला निश्चितपणे वाटतं. लोकसभा निवडणुकीत याद्यांमध्ये घोळ होता. यावेळी काही प्रमाणात तो कमी झालेला आहे. लोकसभेला मतदान प्रक्रिया अत्यंत हळूवार पद्धतीने सुरु होती. यावेळी सिस्टिमध्ये बदल करण्यात आला आहे. लोकसभेसारखे रणरणते ऊन यावेळी नाही. त्यामुळे लोक घराबाहेर पडून मतदान करतील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आज मतदान होत आहे. मात्र मतदानाच्या आदल्या दिवशी काल भाजपचे वरिष्ठ नेते, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणावर मी कालच बोललो आहे. विनोद तावडे यांनी कुठेही पेसै वाटलेले नाहीत. ना त्यांच्या जवळ पैसे मिळाले. जाणून बुजून गोंधळ निर्माण केला जात आहे.





