VIDEO: ‘सावरकर’ प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस विधानसभेत कडाडले
Updated On:

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत चांगलेच कडाडले. सभागृहात वीर सावरकर यांचा गौरव करणारा प्रस्ताव पारित करावा आणि काँग्रेसच्या ‘शिदोरी’ मासिकावर घालावी अशी, मागणी त्यांनी केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान आपण कधीही सहन करणार नाही. आज सभागृहात वीर सावरकर यांचा गौरव करणारा प्रस्ताव पारित करण्याची आणि काँग्रेसच्या ‘शिदोरी’ मासिकावर बंदी घालण्याची वारंवार मागणी केली. मात्र लोकशाहीचा गळा घोटत कामकाज रेटून नेण्यात आले. अतिशय लज्जास्पद आणि घृणास्पद लिखाण असणाऱ्या ‘शिदोरी’ मासिकासंदर्भात कोणतीही भूमिका सरकारने घेतली नाही. सत्तेसाठी शिवसेना कोणत्या थराला जाऊ शकते, हे आज महाराष्ट्राच्या जनतेपुढे पुरते स्पष्ट झाले आहे.





