Devendra Fadanvis On sharada pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह देण्यात आले. त्यानंतर या चिन्हाच्या अनावरण सोहळ्यासाठी रायगडावर शरद पवार गटाकडून मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात आले.त्यानंतर आता राजकीय वर्तुळातून याबाबत प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या रायगडावर जाण्यावर खोचक टोला लगावला आहे.
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमित शरद पवार यांच्या हस्ते या चिन्हाचे अनावर करण्यात आले.यावेळी शरद पवार रोप वे च्या माध्यमातून रायगड किल्ल्यावर पोहचले. त्यानंतर पालखीच्या माध्यमातून त्यांना कार्यक्रमस्थळी नेण्यात आले. तब्बल 40 वर्षानंतर शरद पवार रायगडावर गेले होते यावरूनच देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना याच श्रेय द्यावंच लागेल असा टोला लगावला आहे. | Devendra Fadanvis On sharada pawar
पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले,”मला एकाच गोष्टीचा आनंद वाटतो की, चाळीस वर्षांनंतर शेवटी शरद पवार रायगडावर गेले. अजित पवारांना याचे श्रेय द्यावेच लागेल. ४० वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नमन करण्यासाठी जावं लागलं आणि याचा आनंद देखील वाटत असलयाचे ते यावेळी म्हणाले. | Devendra Fadanvis On sharada pawar
🕒 2.43pm | 24-2-2024 📍 Pune | दु. २.४३ वा. | २४-२-२०२४ 📍 पुणे.
LIVE | Media interaction.#Maharashtra #Pune https://t.co/A5Bwj0pZJE
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 24, 2024
शरद पवार गटाला मिळालेल्या तुतारी या चिन्हाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले तुतारी कुठे, कशी वाजते ? हे भविष्य काळात दिसेलच. पुण्यात नुकतीच मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्ती करण्यात आली त्यानंतर फडणवीस यांनी या अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. | Devendra Fadanvis On sharada pawar
NABARD SO Recruitment 2024 : NABARD मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती.. असा करा अर्ज