PM Kisan Tractor Yojana : शेतकऱ्यांना नवीन ट्रॅक्टर खरेदीसाठी केंद्र सरकार देतय 50% पर्यंत अनुदान; जाणून घ्या संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि कृषी उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत एखाद्या शेतकऱ्याने ट्रॅक्टर खरेदी केल्यास त्याला 20% ते 50% अनुदान सरकारकडून दिले जाते. जे शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाहीत, ते या योजनेत अर्ज करून ट्रॅक्टर अनुदानाचा लाभ घेऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया ही योजना नेमकी काय आहे.
काय आहे पीएम किसान ट्रॅक्टर योजना?
पीएम किसान ट्रॅक्टर योजनेचे उद्दिष्ट केंद्र सरकार पीएम किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 2wd आणि 4wd ट्रॅक्टरवर अनुदान देणार आहे. उत्पादन क्षमता वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. यासाठी, सेवा शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर 50% अनुदान देणार आहे. आजच्या काळात ट्रॅक्टर खूप महाग आहेत त्यामुळे शेतकरी ते सहज विकत घेऊ शकत नाहीत. त्यामुळे सरकारने ही योजना आणली आहे.
या योजनेसाठी काय आहे पात्रता?
अर्जदार हा मूळचा भारतीय असणे आवश्यक आहे. तसेच स्वतःची जिरायती शेतीही असावी.
तसेच त्या व्यक्तीचे स्वतःचे बँक खाते असले पाहिजे जे आधार आणि पॅन कार्डशी जोडलेले असावे.
अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
जर तुम्ही या सुविधेचा एकदा लाभ घेतला असेल तर तुम्हाला त्याचा फायदा पुन्हा मिळणार नाही.
कोणती कागदपत्रे लागतील?
या योजनेसाठी शेतकऱ्याला आधार कार्ड, जमिनीची कागदपत्रे, बँक तपशील, पासपोर्ट आकाराचा फोटो ही कागदपत्रे आवश्यक असणार आहेत.
कुठे कराल अर्ज?
या योजनेअंतर्गत शेतकरी जवळच्या कोणत्याही CSC केंद्राला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.





