Priyanka Chopra : बॅालीवूडची देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राने नुकत्याच एका कार्यक्रमादरम्यान तिच्या फिल्मी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात केलेल्या कठोर परिश्रमाची आठवण शेअर केली. त्यावेळी जे काम मिळायचे ते करणे भाग होते, पण आता प्रोजेक्ट निवडण्याचे स्वातंत्र्य मिळाले असल्याचे प्रियांकाने सांगितले. प्रियांका एका कार्यक्रमात तिच्या सुरुवातीच्या कारकिर्दीबद्दल भरभरून बोलली. जेव्हा ती नवीन अभिनेत्री होती, तेव्हा ती खूप महत्त्वाकांक्षी होती आणि तिला मिळालेल्या कोणत्याही कामाला ती हो म्हणायची. टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, अबू धाबी येथील ब्रिज समिट कार्यक्रमात तिने याबाबत भाष्य केले. ‘माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात मला जे काम मिळेल ते मी स्वीकारले, कारण काम मिळवणे ही एक मोठी गोष्ट होती. यश मिळवण्यासाठी तिने अनेक त्याग केले. यावर बोलताना प्रियांकीने मी वाढदिवस, दिवाळी, ख्रिसमस साजरे केले नाही आणि माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवला नाही. वडील रुग्णालयात असताना त्यांच्यासोबतही राहू न शकल्याची खंतही तिने बोलून दाखवली. मात्र, आता केलेल्या मेहनतीचे फळ मिळाल्याने ती आनंदी असल्याचे तिने सांगितले. आज माझ्याकडे चित्रपटांना कधी हो म्हणायचे आणि कधी नाही म्हणायचे हे निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यावेळी कष्ट केले नसते तर आज मला जे स्वातंत्र्य मिळाले आहे ते मिळाले नसते, असेही प्रियांकाने आवर्जून सांगितले. सध्या प्रियांका दिग्दर्शक राजामौली यांच्या ‘वाराणसी’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे, या चित्रपटात ती महेश बाबूसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. हेही वाचा : “अजित पवार यांचा २०१८ पासून..”; पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांचा सनसनाटी आरोप, आणखी एका व्यक्तीचे घेतले नाव