‘देसी गर्ल’ प्रियंकाचा ‘द ब्लफ’ चित्रपटातील अॅक्शन अवतार

Priyanka Chopra | बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात प्रियंका चोप्राने हॉलिवूडमध्ये मोठे यश मिळवले आहे. लवकरच ती ‘द ब्लफ’ या हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. यात ती समुद्री डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटातील दमदार लुक शेअर करण्यात आला आहे.
या चित्रपटातील लुकमध्ये प्रियंका रक्ताने माखलेली असून, हातात बंदूक धरलेली दिसते. तर दुसऱ्या एका फोटोतील तिचा अॅक्शन अवतार अधिकच प्रभावी वाटतो. प्रियंकाचा हा अॅक्शन अवतार अनेकांच्या पसंतीस पडत आहे. तिच्या या लुकवर अनेकांकडून लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.
निकने देखील इन्स्टाग्राम स्टोरीवर प्रियंकाचा लूक शेअर करत तिचं कौतुक केलं., ‘या चित्रपटात प्रियंका किती अद्भुत आणि शक्तिशाली आहे, हे जगानं पाहावं, याची मी आतुरतेने वाट पाहत आहे,’ असे त्याने प्रियंकासाठी म्हंटले आहे.
View this post on Instagram
या चित्रपटात प्रियंकासोबत कार्ल अर्बन, टेमुएरा मॉरिसन आणि इस्माइल क्रूझ कॉर्डोवा यांसारखे आंतरराष्ट्रीय कलाकार दिसणार आहेत. रुसो ब्रदर्स निर्मित आणि फ्रँक ई. फ्लॉवर्स दिग्दर्शित हा चित्रपट २५ फेब्रुवारी रोजी थेट प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा:
IPAC कंपनीवर ED चा छापा! IPAC प्रमुख प्रतीक जैन नेमके कोण आहेत? ; कंपनीत ममता बॅनर्जींचाही सहभाग





