सोलापूर ( Narsayya Adam Solapur Speech ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांच्या उपस्थितीत दक्षिण सोलापुरातील कुंभारी येथील रे नगर प्रकल्पातील असंघटित कामगारांच्या घरकुलांच्या लोकार्पणाचा सोहळा पार पडला. या सोहळ्यादरम्यान पंतप्रधानांच्या उपस्थितीतच मंचावर घडलेल्या एका प्रकारची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
#सोलापूर | प्रधानमंत्री @narendramodi यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत रे नगर येथे बांधण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरांचे लोकार्पण pic.twitter.com/6M79W1QvIl
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 19, 2024
नेमकं काय घडलं? । Narsayya Adam Solapur Speech
माजी आमदार नरसय्या आडम यांच्या भाषणाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक, माजी आमदार नरसय्या आडम यांचे पाच मिनिटांचे प्रास्ताविक केले,
यादरम्यान, आडम यांनी भाषणात उपमुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला. मात्र आपली चूक लक्षात येताच आडम यांनी आपली चूक सुधारली. आडम यांनी देवेंद्र फडणवीस यांची मंचावरुनच माफी मागितली. मात्र उद्धव ठाकरे यांचा उपमुख्यमंत्री म्हणून केलेल्या उल्लेखाची क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.
असंघटित कामगारांच्या घरकुलांचा भव्य प्रकल्प
असंघटित आणि विडी कामगारांसाठी 350 एकर परिसर, 834 इमारती , 30 हजार फ्लॅट्स ही देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत आहे.
PM Modi in Solapur : ‘लहानपणी मलाही…’ म्हणत पंतप्रधान मोदींचा कंठ दाटला
‘राज्यातले मोदी साहेबांचे वाढते दौरे बघता…’ रोहित पवारांची खोचक टीका