उपमुख्यमंत्री अजित पवार ट्रायडंट हॉटेलमध्ये पोहचले
Updated On:

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सकाळीच मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये सकाळीच पोहचले आहेत. दरम्यान, या हॉटेलमध्ये ते कोणाची भेट घेणार आहेत याविषयी अजून कोणतीही माहिती समोर आली नाही. दरम्यान, राज्यातील सत्तापेचाच्या परिस्थितीत अजित पवार नेमकं कोणतं पाऊल उचणार आहेत याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज राज्यातील सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालया अंतिम निर्णय देणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. प्रत्येक पक्ष आपआपले शक्तिप्रदर्शन करण्यासाठी सरसावले आहेत. त्यातच कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाचा कारभार स्विकारला आहे. त्यामुळे आज एवढ्या सकाळी अजित पवार नेमकं कोणाला भेटायला हॉटेलमध्ये आले आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





