चिंबळी – लॉकडाऊनमुळे कुरुळी (ता. खेड) येथे अडकलेले 117 परप्रांतीय मजूर नांदेड व यवतमाळ जिल्ह्यात रवाना झाले असल्याचे गाव कामगार तलाठी दिपक जाधव यांनी सांगितले. खेड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात असलेल्या कुरुळी येथून 6 खासगी बसमधून मजुरांची रवानगी करण्यात आली.
यावेळी सरपंच सचिन कड, पोलीस हवालदार चंद्रकांत गवारे, सचिन सुर्यवंशी, संतोष रणपिसे, पोलीस पाटील प्रतिभा काबंळे, एम. के. मुऱ्हे, नितीन गायकवाड, आशिष मुऱ्हे, बाळासाहेब बागडे, चदंन मुऱ्हे, अर्जुन बागडे, सागर मुऱ्हे याप्रसंगी उपस्थित होते.