Denmark Open 2024 : सिंधूची दुसऱ्या फेरीत धडक तर लक्ष्य-मालविकाची निराशजनक कामगिरी….

Denmark Open 2024 (Badminton,PV Sindhu) :- भारताची स्टार शटलर असलेल्या पी. व्ही. सिंधूने डेन्मार्क ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. मात्र, लक्ष्य सेन, मालविका बनसोड यांना पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. रितुपर्णा आणि स्वेतापर्णा पांडा यांच्या जोडीला देखील पराभावाचा सामना करावा लागला.
भारताच्या पी. व्ही. सिंधूसमोर तैवानच्या पै यू-पोचे आव्हान होते. मात्र दुसऱ्या फेरीत पैला दुखापत झाल्याने तिने लढतीतून माघार घेतली. यावेळी सिंधू 21-8, 13-7 अशी आघाडीवर होती. पहिल्या सेटपासूनच सिंधूने जबरदस्त खेळाला सुरुवात केली. सिंधूने सलग 5 गुणांची कमाई करताना पहिला सेट 21-8 असा सहज जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये देखील सिंधूने 13-7 अशी आघाडी घेतली होती. मात्र, लढतीतील 26 व्या मिनिटाला पैला दुखापत झाली व तिने माघार घेतली. यापूर्वी 7 वेळेस सिंधू आणि पै आमने सामने आल्या असून यापैकी 5 वेळेस सिंधूने बाजी मारली आहे.
इतर खेळाडूंची निराशाजनक कागगिरी…
भारताच्या लक्ष्य सेन चीनच्या लू गुआंग जू विरुद्ध चिवट झुंज देऊन देखील पराभूत व्हावे लागले. लू गुआंग जूने लक्ष्यला 70 मिनिटांच्या लढतीत 21-12, 19-21, 14-21 असे पराभूत करताना दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. चायना ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारलेल्या मालविका बनसोडला देखील स्पर्धेत पहिल्याच फेरीचा अडथळा पार करण्यात अपयश आले. महिला एकेरीच्या लढतीमध्ये व्हिएतनामच्या गुयेन थुय लिन्हने मालविकाचे आव्हान 21-13,21-12 असे मोडून काढले.
Denmark Open 2024 : लक्ष्य, मालविका अन् आकर्षीला पराभवाचा धक्का…
भारताच्या आकर्षी कश्यपाला देखील पराभवाचा सामना करावा लागला. थायलंडच्या सुपानिडा काटेथोंगने 21-13, 21-12 असे आकर्षीला पराभूत केले. भारताच्या रितुपर्णा आणि स्वेतापर्णा पांडा या बहिणींनाही पहिल्या फेरीत महिला दुहेरीत चायनीज तैपेईच्या चांग चिंग हुई आणि या चिंग तुन यांनी 21-18, 24-22 असे पराभूत केले.





