पिंपरी | लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व समन्वय बैठक उत्साहात

पिंपरी, (प्रतिनिधी) – निगडी येथील भक्ती शक्ती चौकातील अण्णा भाऊ साठे स्मारक येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचे 1 ते 5 ऑगस्ट या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे.
त्याअनुषंगाने महापालिका अधिकारी, उत्सव समितीचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्या समन्वय बैठकीचे आयोजन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृह येथे करण्यात आले होते.
बैठकीत उपस्थितांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाच्या अनुषंगाने विविध सूचना मांडल्या. तसेच उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी उपस्थितांच्या सूचनांचा विचार करून प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात येईल असे सांगितले.
या बैठकीस उप आयुक्त अण्णा बोदडे, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, कमल घोलप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कार्यकारी अभियंता विजय वाईकर, वासुदेव भांडरे,
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष नितीन घोलप, जेजुरी संस्थान समितीचे अध्यक्ष अनिल सौंदडे, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब अढागळे, संदीपान झोंबाडे, मनोज तोरडमल, सतिश भवाळ, दत्तू चव्हाण, डि.पी खंडाळे, योगेश लोंढे, सुनील भिसे, अरूण जोगदंड आदी उपस्थित होते.





