नेटफ्लिक्‍सवर बंदी घालण्याची सोशल मिडियावर मागणी

मुंबई – सध्या संपूर्ण देशाचे लक्ष स्वत:कडे ओढणाऱ्या नेटफ्लिक्‍सवर आता टीकांचे सत्र सुरु झाले आहे. अमेरिकन ऑनलाईन स्ट्रीमिंग कंपनी नेटफ्लिक्‍सविरुद्ध आता तक्रार नोंदवण्यात आली आहे. नेटफ्लिक्‍स आपल्या विविध मालिकांमधून जागतिक स्तरावर भारताचे चुकीचे चित्र उभ करत असल्याचा आरोप सोशल मीडियावर होत आहे. याविरोधात नेटकऱ्यांनी #BanNetFlixInIndia मोहिम उघडली आहे. तसेच शिवसेनेच्या आयटी सेलमधील एका सदस्याने केले आहेत. मुंबईच्या एलटी मार्ग पोलीस स्थानकात रमेश सोलंकी यांनी नेटफ्लिक्‍सविरोधात तक्रार दाखल केली आहे.

नुकतीच प्रदर्शित झालेली सेक्रेड गेम्स (Sacred Games)(दुसरे पर्व), लैला (Leila) आणि राधिका आपटेच्या घुल (Ghoul) या वेबसिरीजविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे स्टॅण्ड अप कॉमेडियन हसन मिव्हाज यांनी त्यांच्या शोमध्ये देशाविरोधी कृत्य केल्याचाही आरोप रमेश यांनी केला आहे. तर नुकतीच लैला नावाची वेबसिरीजही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नेटफ्लिक्‍स इंडियावरील प्रत्येक मालिकेचा जागतिक स्तरावर भारताची बदनामी करण्याचा उद्देश असल्याचे म्हटले जात आहे.

हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल नेटफ्लिक्‍सविरोधात योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे आवाहन सोलंकी यांनी केले आहे. या तक्रारीची एक प्रत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांनाही पाठवल्याचे सोलंकी यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.