रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई – रुपाली चाकणकर म्हणतात की ३५ हजरांपेक्षा अधिक महिलांच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. मात्र, त्यातील किती महिलांना तुम्ही न्याय मिळवून दिलाय? मी देखील ६-६ तक्रारी दिल्या होत्या. त्या तक्रारी तुम्ही पोलिसांकडे ढकलतात. त्यानंतर तुम्ही त्याबद्दल विचारपूस देखील करत नाहीत, की हे प्रकरण तडीस गेले का? किती तक्रारदार महिलांना न्याय मिळाला ? त्याच्यामुळे महिलांवरील अत्याचार वाढत चालले आहेत, असे म्हणत करुणा शर्मा-मुंडे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे.
करुणा मुंडे म्हणाल्या, महिलांच्या आत्महत्या वाढत आहेत. विवाहित मुलगी घरात असताना तिचा नवरा तीन-तीन लग्न करत आहे. जर महिला आयोग काम करत असता तर अशा घटना घडल्या नसत्या. तुम्ही काहीच काम करत नाहीत. रुपाली चाकणकर तुम्ही राजीनामा द्या. चांगले सामाजिक काम करणारी महिला त्याठिकाणी बसवा. राजकीय महिला महिला आयोगात नको आहे. ज्यांचे काम सभा घेणे नाही, तर महिलांना न्याय देणे ही आहे. महिलांसाठी भरपूर कायदे आहेत. मात्र, त्यांना न्याय मिळत नाही, असंही करुणा शर्मा म्हणाल्या.





