आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातला गेल्याने मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई – महाराष्ट्रातील नागपूरमध्ये होणारा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट आता गुजरातमधील वडोदऱ्याला होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. लाखो तरूणांना रोजगार देणारा हजारो कोटींचा वेदांता -फाॅक्सकाॅन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर आता तब्बल 22 हजार कोटींचा हा एअरक्राफ्ट प्रकल्पही गुजरातला गेल्याने शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका होत आहे. गुजरातमध्ये 30 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 22 हजार कोटींचा हा प्रकल्प नागपूरला होणार असल्याचे एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले होते.
महाराष्ट्रातून मेगा प्रकल्प गुजरातला हस्तांतरीत करण्यासाठीच भाजपने शिंदेना मुख्यमंत्री पदावर बसवले आहे.@NCPspeaks@BJP4India @BJP4Maharashtra #NCP #Maharashtra #Gujarat #EknathShinde #BJP #ModiGovt #VedantaFoxconn #C295 pic.twitter.com/EcwpvMO5mf
— Mahesh Bharat Tapase महेश भारत तपासे (@maheshtapase) October 27, 2022
यावरून आता राज्यातील राजकारण तापले असून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. तर राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून मेगा प्रकल्प गुजरातला हस्तांतरीत करण्यासाठीच भाजपने शिंदेना मुख्यमंत्री पदावर बसवले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आपल्या राजकीय स्वामींसमोर नमल्याबद्दल आणि महाराष्ट्रातून प्रकल्प गमावूनही त्याला विरोध न करता गुजरातचा महाराष्ट्रावर सर्जिकल स्ट्राईक सुरू असताना शिंदे आपले मुख्यमंत्रीपद सुरक्षित ठेवण्यात व्यस्त आहेत.
— Mahesh Bharat Tapase महेश भारत तपासे (@maheshtapase) October 27, 2022
‘वेदांत फॉक्सकॉनमधून बाहेर पडल्यानंतर सी-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट तयार करण्याचा टाटा एअरबसचा प्रकल्प नागपुरात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले होते. मात्र एकनाथ शिंदे यांची खोटी भूमिका आता सर्वांसमोर उघडी पडलेली आहे’, असा आरोप महेश तपासे यांनी ट्विटद्वारे केला आहे.
वेदांत फॉक्सकॉनमधून बाहेर पडल्यानंतर सी-२९५ मिलिटरी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट तयार करण्याचा टाटा एअरबसचा प्रकल्प नागपुरात येईल असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले होते. मात्र एकनाथ शिंदे यांची खोटी भूमिका आता सर्वांसमोर उघडी पडलेली आहे.
— Mahesh Bharat Tapase महेश भारत तपासे (@maheshtapase) October 27, 2022
दरम्यान, महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी हा प्रकल्प गुजरातला जाण्याबाबत महाविकास आघाडीला जबाबदार धरले आहे. उपाध्ये म्हणाले, सुमारे वर्षभरापूर्वीच गुजरातेत गेलेल्या एअरबस प्रकल्पावरून टीका करणे म्हणजे महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या जनतेशी केलेले पाप लपविण्याचा प्रकार आहे.
आणखी एक मोठा प्रकल्प गेला गुजरातला, उद्योगमंत्र्यांनी महाराष्ट्रात होणार असल्याची केली होती घोषणा https://t.co/L4NhQ78Egm
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 27, 2022





