Satara | पुसेसावळीत कचरा उघड्यावर टाकणारावर कारवाईची मागणी
Updated On:

पुसेसावळी, (प्रतिनिधी) – दररोज सहा ट्राँली कचरा गोळा होणाऱ्या खटाव तालुक्यातील पुसेसावळीत अद्याप कचरा उघड्यावर पडतानाचे चित्र दिसत आहे. उघड्यावर पडलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत चालली आहे.
ग्रामपंचायतीने कचरा संकलनासाठी ट्रँक्टर व ट्राँलीचे नियोजन केले आहे. नियमितपणे कचरा संकलीत केला जातो. तरीही काही शिक्षित ग्रामस्थांकडून कचरा हा कचरा ट्राँलीत न टाकता रस्त्याकडेला फेकला जातो.त्यामुळे परिसर विद्रुप दिसत आहे.
सदरच्या कचऱ्यात ओला व सुका कचरा एकत्र असल्याने व कित्येक महिने कचरा रस्त्याकडेला पडून कुजल्याने रोगराई निर्माण होण्याची शक्यता असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे समोर येत आहे.
ग्रामपंचायतीने केलेल्या सुविधेचा उपयोग न करता समाजाचे आरोग्य बिघडवणाऱ्या ग्रामस्थांवर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांतून होत आहे.





