Delnaaz Irani : टीव्ही अभिनेत्रीने घटस्फोटानंतर नाकारली पोटगी; कारण सांगत केली नवी सुरुवात
Delnaaz Irani : आता तब्बल १४ वर्षांनंतर डेलनाजनं या घटस्फोटावर मौन सोडलं असून, या प्रवासात तिला झालेल्या भावनिक त्रासाबाबत तिने सांगितले आहे.

Delnaaz Irani : टीव्ही अभिनेत्री डेलनाज इराणीने एका मुलाखतीत वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. तिच्या आयुष्यातील काही कठीण काळाबद्दल सांगितलं आहे. डेलनाज इराणीने १९९८ मध्ये राजीव पॉल यांच्याशी लग्न केले होते, मात्र २०१२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
तिचा राजीव पॉलचा घटस्फोट हा एकेकाळी इंडस्ट्रीत चर्चेचा विषय ठरला होता. आता तब्बल १४ वर्षांनंतर डेलनाजनं या घटस्फोटावर मौन सोडलं असून, या प्रवासात तिला झालेल्या भावनिक त्रासाबाबत तिने सांगितले आहे. Delnaaz Irani
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत डेलनाजनं सांगितलं की, “जेव्हा तुम्ही मानसिक आणि भावनिकदृष्ट्या एखाद्या नात्यातून बाहेर पडता, तेव्हा एकाच घरात दोन अनोळखी लोक राहत असल्यासारखे वाटते. २०१० मध्ये जरी ते वेगळे झाले असले, तरी मानसिकदृष्ट्या मी त्या लग्नातून खूप आधीच बाहेर पडली होती.
कधी कधी नात्यात प्रेम आणि आदर दोन्ही संपून जातं. माझ्यासाठी नात्यात आदर असणं सर्वात महत्त्वाचं आहे. जेव्हा तो उरत नाही, तेव्हा स्वतःशी खोटं बोलून त्या नात्यात राहण्यापेक्षा बाहेर पडणं कधीही चांगलं असतं.” Delnaaz Irani
पुढे डेलनाजने सांगितले की, घटस्फोटाच्या बदल्यात तिने कोणतीही पोटगी स्वीकारली नाही. कारण तो घटस्फोट खूप गुंतागुंतीचा होता कारण एकाला तो हवा होता आणि दुसऱ्याला नको होता. त्या काळात अनेक अफवा पसरल्या होत्या, पण मी पैशांपेक्षा शांततेला महत्त्व दिले. विखुरलेली स्वप्ने सावरून आयुष्यात पुढे जाणे कठीण होते, पण मी ते केले,” असे डेलनाज यांनी नमूद केले.
त्यावेळी कोणत्याही कायदेशीर लढाईत अडकण्यापेक्षा मला माझ्या मनाची शांतता हवी होती, मी त्यालाच महत्त्व दिलं. मी पैशांचा, पोटगीचा विचारही केला नाही. मला त्या घटस्फोटातून काहीही मिळालं नाही, मी पोटगी घेण्यास नकार दिला. मला त्या सगळ्या कटू आठवणींतून बाहेर पडायचं होतं. शांततेत जगायचं होतं, असंही ती म्हणाली.
दरम्यान, राजीव आणि डेलनाज यांची भेट १९९३ मध्ये ‘परिवर्तन’ मालिकेच्या सेटवर झाली होती. त्यानंतर १९९८ मध्ये त्यांनी लग्न केलं होतं. लग्न झालं तेव्हा डेलनाज फक्त २२ वर्षांची होती. तर आता घटस्फोटानंतर ती बॉयफ्रेंड पर्सी कारकरियासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत आहे.
हेही वाचा:


