मुंबई – आयपीएल स्पर्धेत एक गोलंदाज म्हणून निवड झालेला अक्सर पटेल फलंदाजीतही चमकदार कामगिरी केली आहे. आता तर त्याला या स्पर्धेत एका नव्या विक्रमाची संधी आहे. अक्सरने आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत 111 सामने खेळले आहेत. अक्सरला या स्पर्धेत शंभर बळी पूर्ण करण्याची संधी आहे. सध्या त्याच्या नावावर 95 बळी आहेत. दिल्लीकडून खेळताना त्याच्या गोलंदाजीसह फलंदाजीमुळेही संघाला लाभ होत आहे. त्याला या स्पर्धेच्या इतिहासातील 1 हजार धावाही पूर्ण करता येणार आहेत. यासाठी त्याला केवळ एका धावेची गरज आहे. दिल्लीचा पुढील सामना लखनौ सुपर जायंट्स विरूध्द 7 एप्रिल रोजी होणार आहे. या सामन्यात अक्सर पटेल हा विक्रम करू शकतो. दरम्यान, अक्सरने या हंगामातील स्पर्धेत मुंबई विरूध्दच्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती. त्याने 17 चेंडूत 38 धावा केल्या होत्या. त्याने 2 चौकार आणि 3 षटकार लगावले होते. त्यानंतरच्या गुजरात विरूध्दच्या सामन्यात त्याला 8 च धावा काढता आल्या होत्या. गोलंदाजीत अक्सरला दोन्ही सामन्यात विकेट्स मिळवण्यात अपयश आले आहे.