Rekha Gupta – दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिल्ली पोलिस आयुक्त एसबीके सिंग यांची बदली झाली असून त्यांची जागा आता १९९२ च्या बॅचचे अधिकारी सतीश गोलचा यांनी घेतली आहे. होमगार्ड्सचे महासंचालक एसबीके सिंग यांना दिल्ली आयुक्त म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता आणि त्यांनी १ ऑगस्ट रोजीच पदभार स्वीकारला होता. सिंग हे एजीएमयूटी (अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेश) कॅडरचे १९८८ च्या बॅचचे अधिकारी आहेत. ….अन् मुख्यमंत्र्यांना थप्पड मारली! मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री जनसुनावणी घेत असताना. त्याच वेळी एक व्यक्ती त्यांची तक्रार घेऊन त्याठिकाणी पोहोचला. या दरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांना थप्पड मारली. त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्ली भाजपचे प्रवक्ते प्रवीण शंकर यांनी असेही सांगितले की, सार्वजनिक सुनावणीच्या बहाण्याने एक व्यक्ती सीएम गुप्ता यांच्याकडे पोहोचली. त्याने प्रथम मुख्यमंत्र्यांना काही कागदपत्रे दिली, नंतर ओरडण्यास सुरुवात केली आणि त्यांना कानशिलात लगावली.