नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला मोठे यश मिळाले आहे. श्रीनगरच्या जैश-ए-मोहम्मदच्या वाँटेड दहशतवाद्याला अटक केली आहे. २०१५ पासून तो फरार होता. आज अखेर त्याला अटक करण्यात यश आले.
फैयाज अहमद लोन असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. दिल्ली पोलिसांनी लोन याच्यावर २ लाखांचे बक्षीस ठेवले होते. २०१५ पासून अटक न टाळण्यासाठी पळत होता. त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते.
A wanted terrorist of Jaish-e-Mohammad, Faiyaz Ahmed Lone, has been arrested from Srinagar, J&K by Special Cell, Delhi. He was carrying a reward of Rs 2 Lakh on his head,announced by Delhi police. Non-bailable warrant had been issued against him. He was evading arrest since 2015. pic.twitter.com/eADM1Pcn0m
— ANI (@ANI) April 1, 2019
दरम्यान, २००७ मध्ये लोनसह तीन जणांना दिल्ली पोलिसांनी पकडले होते. २०१५ साली दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तेव्हापासून आपल्या दोन साथीदारांसह लोन फरार होता.