Delhi : मुख्यमंत्री कार्यालयातून भगतसिंग आणि आंबेडकरांचे फोटो हटवले; विरोधकांच्या आरोपांवर रेखा गुप्ता यांनी स्पष्ट केली भूमिका

CM Rekha Gupta | दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या विधानसभेतील कार्यालयातून संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांचे फोटो काढून टाकण्यात आल्याचा दावा आम आदमी पार्टीने केला आहे. यावरून राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारच्या काळात प्रत्येक सरकारी कार्यालयात आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांचे फोटो लावण्यात आले होते. पण आज जेव्हा आम्ही दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना त्यांच्या विधानसभेतील कार्यालयात भेटायला गेलो तेव्हा आम्हाला दिसले की दोन्ही फोटो मुख्यमंत्री कार्यालयातून काढून टाकण्यात आले आहेत, आम आदमी पक्ष याचा तीव्र विरोध करतो असे आतिशी यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि महात्मा गांधी यांचे फोटो आहेत असा दावा आपने केला आहे. यावर आता मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी स्पष्टीकरण दिले आहे. CM Rekha Gupta |
रेखा गुप्ता काय म्हणाल्या?
मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या की, “येथे सरकारचे प्रमुख, देशाचे राष्ट्रपती आणि राष्ट्रपती महात्मा गांधी यांचा फोटो लागला नाही पाहीजे का? शहीद भगतसिंह आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशाचे प्रणेते आहेत, ते आदरणीय आणि मार्गदर्शक आहेत. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देणे माझे काम नाही. मी जनतेच्या प्रति नेहमीच उत्तर देईन.” CM Rekha Gupta |
दिल्ली की नई बीजेपी सरकार ने बाबा साहेब की फोटो हटाकर प्रधान मंत्री मोदी जी की फोटो लगा दी। ये सही नहीं है। इस से बाबा साहेब के करोड़ो अनुयायियों को ठेस पहुँची है।
मेरी बीजेपी से प्रार्थना है। आप प्रधान मंत्री जी की फोटो लगा लीजिए लेकिन बाबा साहिब की फोटो तो मत हटाइए। उनकी फोटो… https://t.co/k9A2HKFECV
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 24, 2025
या बदलावरून विरोधकांनी भाजपवर टीका सुरू केली आहे. आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंह यांचा अपमान म्हटले असून भाजप सरकार इतिहास बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.
अरविंद केजरीवाल काय म्हणाले होते?
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक (आप) अरविंद केजरीवाल यांनीही फोटो काढण्यावर आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले, “दिल्लीच्या नवीन भाजप सरकारने बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढून पंतप्रधान मोदी यांचा फोटो लावला. हे बरोबर नाही. यामुळे बाबा साहेबांच्या कोट्यावधी अनुयायांची मनं दुखावली. मी भाजपाला विनंती करतो. तुम्ही पंतप्रधानांचा फोटो ठेवा, पण बाबा साहेब आंबेडकरांचा फोटो काढू नका. त्यांचा फोटो तेथे कायम ठेवा.’
व्हायरल फोटोत नेमकं काय?
व्हायरल फोटोत दिसत आहे की, मुख्यमंत्री कार्यालयात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, महात्मा गांधी आणि पंतप्रधान मोदी यांचे फोटो लागले आहेत. तर आधीच्या फोटोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंह यांचे फोटो दिसून येत आहेत. या मुद्य्यावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
हेही वाचा:
अमेरिकेच्या धोरणात मोठा बदल, युक्रेनविरोधात ट्रम्प यांची रशियाला साथ? UN मध्ये नक्की काय घडलं? वाचा





