Delhi Rain: यमुनेची पातळी धोक्याचे चिन्ह ओलांडून 205.35 मीटरवर पोहोचली
Updated On:

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीला आज पुन्हा पावसाने झोडपले. आयटीओसारख्या शहराच्या काही भागात पाणी साचले असून त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. नोएडा आणि गाझियाबादसह दिल्ली-एनसीआर भागातील काही भागांमध्ये पहाटे मुसळधार पाऊस झाला. हवामान खात्याने 27 जुलैपर्यंत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
दरम्यान,दिल्लीतील यमुना नदी अजूनही धोक्याच्या खुणेच्या काही सेंटीमीटर खाली वाहत आहे. मंगळवारी रात्री दहा वाजता, जुन्या यमुना पुलाजवळ यमुना पाण्याची पातळी 205.24 मीटर नोंदवण्यात आली. सकाळी सात वाजता त्यात पुन्हा वाढ होऊन ती 205.32 मीटर इतकी झाली. पाण्याची पातळी वाढणे ही चिंतेची बाब आहे, ज्यामुळे राजधानी आणि लगतच्या प्रदेशात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.




