दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना ईडीकडून अटक
Updated On:

नवी दिल्ली – दिल्लीचे आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय सत्येंद्र जैन यांना मनि लॉंडरींग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने आज अटक केली.
कोलकाता येथील एका फर्मसोबत हवाला गैरव्यवहारात जैन यांचा सहभाग असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ईडीने दोन महिन्यांपूर्वी जैन आणि त्यांच्या कुटुंबियांची 4.71 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केली होती. त्यानंतर आता ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे.





