Dehli: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांच्या वडिलांचे निधन; केजरीवाल आणि सिसोदियांकडून शोक व्यक्त
Delhi: अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विजय सिंह यांना श्रद्धांजली वाहिली. "ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Dehli: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि ‘आप’ नेत्या आतिशी यांचे वडील विजय सिंह यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी तीव्र दुःख व्यक्त करत आतिशी व त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना प्रकट केल्या आहेत.
अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विजय सिंह यांना श्रद्धांजली वाहिली. “ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
हेही वाचा – महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा इशारा; ‘या’ 12 जिल्ह्यांना यलो अलर्ट
माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी विजय सिंह यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, “दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांचे वडील विजय सिंह जी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत हृदयद्रावक आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी समर्पित केले होते. त्यांनी नेहमीच शिक्षण आणि मूल्यांवर आधारित जीवन जगण्याला प्राधान्य दिले.”
भगवान उनकी आत्मा को शांति दे।
ॐ शांति https://t.co/fai7MZ9sBv
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 17, 2026
या कठीण प्रसंगात आपण आतिशी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत असून, ईश्वराने त्यांना या अतीव दुःखातून सावरण्याची शक्ती द्यावी, अशी प्रार्थनाही सिसोदिया यांनी केली आहे.





