Delhi excise policy case : केजरीवालांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपची जोरदार निदर्शने

नवी दिल्ली – उत्पादन शुल्क घोटाळ्यातील कथित गैरव्यवहाराच्या कारणास्तव मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आज भाजपने दिल्लीच्या काही भागात जोरदार निदर्शने केली. काल उपमुख्यमंत्री सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी दिलेले राजीनामे हा सत्याचा आणि भाजपचा विजय असल्याची भावनाही भाजपने व्यक्त केली आहे.
आम आदमी पक्षाच्या सरकारने शाळांपर्यंत मद्य पोहोचवण्याचे हे धोरण आखले होते त्याप्रकरणी आम्ही व्यापक जनहित चळवळ करू, असेही भाजपने म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज भाजपने दिल्लीत केजरीवालांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निदर्शने केली.
या संबंधात बोलताना दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांनी म्हटले आहे की, आपले दोन्ही मंत्री निर्दोष आहेत असा दावा मुख्यमंत्री केजरीवाल करीत आहेत, मग त्यांना कोर्टाने दिलासा का दिला नाही आणि त्यांना राजीनामा का द्यावा लागला याचा खुलासा केजरीवाल यांनी करावा.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/jayantrao-patil-will-raise-his-voice-in-the-hall-regarding-gas-price-hike-and-farmers-electricity-cuts/
दिल्लीतील उत्पादनशुल्क धोरण गैरव्यवहाराचा मुख्य सूत्रधार केजरीवाल हेच आहेत असा आरोप दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्ष नेते रामवीरसिंग बिधुरी यांनी केला आहे.





