Delhi Election – दिल्ली महानगरपालिकेतील 12 वार्डसाठीच्या पोटनिवडणूका 30 नोव्हेंबरला घेण्यात आल्या होत्या. या निवडणुकांची मतमोजणी बुधवारी करण्यात आली. यामध्ये भाजपने 7, आम आदमी पक्षाने 3 तर कॉंग्रेसने १ तर १ जागेवर अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला. या निवडणूकीमध्ये भाजपने २ जागा गमावल्या आहेत. ज्या 12 वार्डमध्ये निवडणूका झाल्या त्यापैकी 9 जागा भाजपकडे होत्या, आता 7 जागा शिल्लक राहिल्या आहेत. निवडणूकीमध्ये केवळ 38.51 टक्के मतदान झाले होते. दिल्ली राज्य निवडणूक आयोगाच्या मते, या 12 जागांसाठी १४३ मतदान केंद्रांवरील ५८० बूथवर मतदान घेण्यात आले. अनेक जागांवर आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये चुरशीची लढत झाली.