दिल्ली क्रिकेट संघटनेने केली मुदतीची मागणी
Updated On:

नवी दिल्ली : दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघटनेने निवडणूक घेण्यासाठी उच्च न्यायालयाकडे सहा आठवड्यांची मुदत मागितली आहे.
संघटनेतील कामकाज लोकपालांच्या देखरेखीखाली सुरू आहे. ही निवडणूक संघटनेचे अध्यक्ष व खजिनदार निवडण्यासाठी घेण्यात येणार असून त्यात अध्यक्षपदासाठी अरुण जेटली यांचा मुलगा रोहन इच्छुक आहे. त्यामुळे या निवडणुकीला प्रतिष्ठेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आर्थिक हितसंबंधांच्या मुद्यावरून लोकपालांनी काही संचालकांना मुदत संपुष्टात आल्यानंतरही जर संघटनेत कार्यरत राहायचे असेल तर या निवडणुकीत विजय मिळावा व पदावर या, असे संकेत दिले आहेत.
आता उच्च न्यायालय संघटनेला मुदत देणार का, ते येत्या बुधवारपर्यंत जाहीर होणार आहे.





