I-League Football : आगामी हंगामात दिल्लीचे दोन संघ
Updated On:

नवी दिल्ली – आगामी आय-लीग हंगामात दिल्लीचे दोन संघ असू शकतात, अशी माहिती अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. एआयएफएफने अलीकडेच दिल्ली, रांची, जयपूर, जोधपूर, भोपाळ, लखनऊ आणि अहमदाबाद या शहरांकडून निविदा मागविल्या आहेत ज्यांचा आय-लीगमध्ये समावेश नव्हता.
आय-लीगच्या शेवटच्या सत्रात 11 क्लब होते, ज्यामध्ये एआयएफएफचा इंडियन एरोजचा संघ देखील होता. तर गतविजेत्या मोहन बागानचा संघ एटीके संघामध्ये विलीन झाला आहे. पुढच्या सत्रात तो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) खेळेल.
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांच्या 36 व्या वाढदिवशी दिल्ली फुटबॉलने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पटेल यांनी हे सांगितले.





