दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांचा विजय ; भाजपचे रमेश बिधुरी यांचा केला पराभव

Delhi Chief Minister Atishi wins । दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी कालकाजी येथून निवडणूक जिंकली आहे. त्यांनी निवडणुकीत भाजपचे रमेश बिधुरी यांचा पराभव केला आहे. राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांचाही निवडणुकीत पराभव झाला आहे.
रमेश बिधुरी यांचा केला पराभव Delhi Chief Minister Atishi wins ।
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री आतिशी यांनी सुमारे तीन हजार मतांनी निवडणूक जिंकली आहे. अतिथीच्या लढतीत रमेश बिधुरीपेक्षा पिछाडीवर असणाऱ्या अतिशी यांनी अखेर विजयावर नाव कोरले आहे. तर तिकडे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
अरविंद केजरीवाल,मनीष सिसोदियांचाही पराभव Delhi Chief Minister Atishi wins ।
नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात प्रवेश वर्मा यांनी त्यांचा दारुण पराभव पत्करावा लागला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने प्रवेश वर्मा यांना तर काँग्रेसने संदीप दीक्षित यांना तिकीट दिले होते. या निवडणुकीत प्रवेश वर्मा यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय मिळवला आहे.
अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आम आदमी पक्षाच्या इतर अनेक मोठ्या नेत्यांना निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. मनीष सिसोदिया यांना जंगपुरा मतदारसंघातूनही पराभव पत्करावा लागला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना कठीण स्पर्धेचा सामना करावा लागत आहे आणि त्यांच्या पराभवाचा धोका आहे.





