अहमदाबाद – गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यात आम आदमी पक्ष (आप) झपाट्याने वाढत असल्याचा दावा केला आहे.
यासोबतच त्यांनी ट्विट करून “भाजप प्रचंड नाराज आहे. गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप अमित शहा यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करणार आहे, हे खरे आहे का? भूपेंद्रभाई पटेल यांच्या कामावर भाजपही नाराज आहे का? असे प्रश्न उपस्थित करत निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सर्व बैठका, दौरे रद्द; डाॅक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
गुजरातमध्ये यावर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. येथे भाजप सत्तेत आहे आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस आहे. दिल्ली आणि पंजाबनंतर आता गुजरातमध्येही “आप” चांगली कामगिरी दाखवेल याचा पक्षाला विश्वास आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल सातत्याने गुजरात दौऱ्यावर आहेत.