Delhi Car Blast। सोमवारी संध्याकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ एका चालत्या कारमध्ये अचानक मोठा स्फोट झाल्याने दिल्ली हादरली. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्यामुळे संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला. आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे आणि २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. पार्क केलेल्या अनेक वाहने जळून खाक झाल्या आहेत. दरम्यान या स्फोटानंतर आता ASI ने लाल किल्ल्यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. सोमवारी दिल्लीत झालेल्या भीषण कार बॉम्बस्फोटानंतर, सुरक्षा यंत्रणांनी राजधानीत अलर्ट जारी केला आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ने पुढील तीन दिवसांसाठी ऐतिहासिक लाल किल्ला जनतेसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, काल दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर, राजधानीतील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. दिल्ली पोलिस, स्पेशल सेल आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी) यांच्या पथके काल रात्रीपासून सतर्क आहेत. स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी पहाडगंज, दर्यागंज, कॅनॉट प्लेस आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली. Delhi Car Blast। पोलिस पथकांनी परिसरातील जवळजवळ सर्व हॉटेल्स, लॉज आणि गेस्ट हाऊसमध्ये, मोठ्या आणि लहान अशा दोन्ही ठिकाणी शोध मोहीम राबवली. या शोध मोहिमेदरम्यान, गेल्या ४८ तासांत कोणी खोल्या बुक केल्या आहेत हे शोधण्यासाठी हॉटेलच्या रजिस्टरची तपासणी करण्यात आली. कोणत्याही संशयास्पद हालचाली ओळखण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जात आहे. तपासादरम्यान, पोलिसांनी चार संशयितांची ओळख पटवली आहे. या चार व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्यांची चौकशी केली जात आहे. तथापि, पोलिसांनी अद्याप त्यांची ओळख किंवा अटक अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही. Delhi Car Blast।