Delhi Blast। दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणी जम्मू आणि काश्मीरमधील उमर आणि आमिर या दोन तरुणांना काल रात्री अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेवर कुटुंबाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्फोटात वापरलेल्या कारविषयी त्याच्या कुटुंबाने प्रतिक्रिया दिली आहे. जम्मू काश्मीरमधून अटक करण्यात आलेल्या संशियतच्या कुटुंबियांनाही दावा आहे की, त्यांची मुले कधीही दिल्लीला गेली नाहीत आणि त्यांच्याकडे हरियाणा नोंदणी क्रमांक असलेले वाहन नाही.” असे त्यांनी म्हटले आहे. तसेच कुटुंबीयांनी असाही दावा केला आहे कि, त्यांची गाडी अजून त्यांच्या दारातच उभी असल्याचे म्हटले आहे. Delhi Blast। दरम्यान, स्फोटापूर्वी, सोमवारी सकाळी, जम्मू-काश्मीर आणि फरीदाबाद पोलिसांनी संयुक्त कारवाईत दोन वेगवेगळ्या घरांमधून २,९०० किलो आयईडी बनवणारे रसायने, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला. ही कारवाई जैश-ए-मोहम्मद (जेईएम) आणि अन्सार गजवत-उल-हिंद (एजीयूएच) शी जोडलेल्या आंतरराज्यीय दहशतवादी नेटवर्कचा नाश करताना झाली. दिल्ली स्फोटाशी जप्त केलेली ही वस्तू जवळ असल्याने एजन्सींमध्ये चिंता निर्माण झाली आहे.