दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, पंतप्रधान मोदी नागरिकांना आवाहन करत म्हणाले…

Delhi Assembly Elections 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया आज (5 फेब्रुवारी) सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष (आप), काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात थेट सामना होणार असल्याचे सांगितले जात आहे.
दिल्लीतील सर्व 70 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. जवळपास 699 उमेदवारांचे भवितव्य आज मतपेठीत बंद होईल. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
दिल्ली विधानसभा चुनाव में आज सभी सीटों के लिए वोट डाले जाएंगे। यहां के मतदाताओं से मेरा आग्रह है कि वे लोकतंत्र के इस उत्सव में पूरे उत्साह के साथ हिस्सा लें और अपना कीमती वोट जरूर डालें। इस अवसर पर पहली बार वोट देने जा रहे सभी युवा साथियों को मेरी विशेष शुभकामनाएं। याद रखना है-…
— Narendra Modi (@narendramodi) February 5, 2025
नरेंद्र मोदी यांनी पोस्टमध्ये लिहिले की, ‘दिल्ली विधानसभा निवडणुकीत आज सर्व जागांसाठी मतदान होणार आहे. मतदान करणाऱ्या नागरिकांना माझे आवाहन आहे की, लोकशाहीच्या या उत्सवात उत्साहाने सहभागी व्हावे व आपले अमूल्य मत द्यावे. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या सर्व तरुण मतदारांना माझ्या विशेष शुभेच्छा. लक्षात ठेवा – आधी मतदान, मग जलपान!’
दरम्यान, दिल्लीत आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर 8 फेब्रुवारीला मतमोजणी होईल. दिल्लीत 70 जागांसाठी 699 उमेदवार रिंगणात आहेत. जवळपास 1.56 कोटी नागरिक आज मतदानाचा हक्क बजावतील. 13,766 मतदान केंद्रांवर मतदान पार पडणार असून, यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.





