Pimpri : स्वच्छ सर्वेक्षणात देहू नगरपंचायत ३६८ व्या स्थानावर

देहूरोड : स्वच्छ भारत अभियानांतर्गत ” स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ “झालेल्या स्पर्धेत देहू नगरपंचायतीने देशात ३६८ व्या स्थानावर आहे. गतवर्षी ( २०२४ ) ७१७ तर दोन वर्षापूर्वी १९३५ व्या क्रमांकावर देहू नगरपंचायत होते.
देहू नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती, सर्व नगरसेवक. नगरसेविका, मुख्याधिकारी, नगरपंचायतीचे सर्व अधिकारी, सफाई कर्मचाऱ्यांनी केलेले परिश्रम आणि नागरिकांनी दिलेला सकारात्मक प्रतिसादामुळे सांघिक प्रयत्न व नाविन्यपूर्ण प्रकल्पाचा अंतर्भावामुळे यंदा राष्ट्रीय पातळीवर ३६८ वे क्रमांक मिळाले आहे. स्वच्छ सर्वेक्षण करण्यासाठी वर्षभरामध्ये शासनाचे तीन पथक येत असतात हगणदारी मुक्त आणि कचरा मुक्त शहराची पाहणी करूनच क्रमांक दिले जातात.
” स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा ” अभियान सन २०२५- २६अंतर्गत देशात पहिल्या १० क्रमांकामध्ये येण्यासाठी ओला व सुका कचरा वर्गीकरण व प्रक्रिया करून परिसर कचरा मुक्त करणे. पर्यावरण प्रदूषण मुक्त राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे तसेच परिसरात प्लॅस्टिक बंदी करण्यात आली आहे. नागरिकांनी कचरा उघड्यावर टाकू नये. ओला व सुका कचरा वर्गीकरण करून घंटागाडीतच टाकावा, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले असून जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबविली आहे. परिसर स्वच्छ ठेवणेयासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे.
नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती, सर्व नगरसेवक – नगरसेविका, नगरपंचायतीचे सर्व अधिकारी, सफाई कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे स्वच्छतेमध्ये प्रगती केली आहे. देहू नगरपंचायतीचा मान उंचवण्यासाठी आगामी वर्षभरामध्ये देशात पहिल्या दहा क्रमांकामध्ये येण्यासाठी विशेष प्रयत्न असणार आहे.
– चेतन कोंडे मुख्याधिकारी , देहू नगरपंचायत.





