पिंपरी | देहू – आळंदी मार्गावर प्रवाशांची ससेहोलपट

मोशी (वार्ताहर) – आळंदी- देहू मार्गावर इतर दिवशी दर दहा मिनिटाला बसेस सोडल्या जातात. मात्र आज एकादशी असल्याने प्रवाशांची संख्याही लक्षणीय होती. तरीदेखील पीएमपीएमएलकडून आज संपूर्ण दिवसभर अपुर्या बसेस सोडल्याने प्रवाशांची ससेहोलपट झाल्याचे चित्र प्रत्येक बस थांब्यावर दिसून येत होते.
पीएमपीएमएलच्या आळंदी-देहू बसमार्गावर भाविक न नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. चिखली, कुदळवाडी, तळवडे येथलि कारखान्यातील कामगारांना स्वस्तामधील प्रवासाचे साधन उपलब्ध झाले आहे.
तर दर एकादशीला तसेच रविवार गुरुवार व इतर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी या मार्गावर जादा बसेस सोडण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे. मात्र, एकादशीला या मार्गावर बसची संख्या अपुरी असल्याने भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागला. निदान यापुढे अशा महत्त्वाच्या दिवशी जादा बसेस सोडाव्यात अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.





