इस्लामाबाद – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मदत जारी केल्यानंतर पाकिस्तानच्या रिझर्व बँकेने अचानक आपल्या मुख्य व्याजदरात 0.50% ची कपात केली आहे. त्यामुळे पाकच्या रिझर्व बँकेचा मुख्य व्याजदर आता 10.5% इतका झाला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला महागाई कमी करण्याचा सल्ला दिलेला आहे.त्याच आधारावर मदत झाली केली आहे. अजूनही उच्च पातळीवर असून रिझर्व बँकेने मात्र अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हा धाडसी निर्णय घेतला असल्याचे सांगितले जाते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने महागाई कमी करण्यासाठी व्याजदर 11% या पातळीवर कायम ठेवण्याची सूचना केली होती. मात्र पाकिस्तानच्या पत धोरण समितीने याकडे दुर्लक्ष करून व्याजदर आता अर्धा टक्के कपात करण्यात धाडसी निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या रिझर्व बँकेने पतरणावेळी पहिल्या सहा महिन्याचा विकासदर 4.5% राहिला असे सांगितले आहे आणि व्याजदरात कपात केल्यामुळे आगामी काळात तो वाढण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे भारताचा विकासदर या तिमाहीत 8.2% इतका आहे. तर वार्षिक विकास दर 7.5% पेक्षा जास्त राहणार आहे.