वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून सुनील टिंगरेंचा पराभव; बापूसाहेब पठारे यांचा दणदणीत विजय

Updated On:
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून सुनील टिंगरेंचा पराभव; बापूसाहेब पठारे यांचा दणदणीत विजय

Vadgaonsheri Assembly Constituency |  वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागले होते. या मतदारसंघातून बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी – एसपी) आणि सुनील टिंगरे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्यात प्रमुख लढत होती. अखेर येथून बापूसाहेब पठारे यांचा मोठा विजय झाला आहे. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात बापूसाहेब पठारे हे 4710 मताधिक्याने विजयी झाले आहेत.

2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रतिनिधित्व करणारे सुनील टिंगरे हे विजयी झाले होते. त्यांनी भाजपचे विद्यमान आमदार जगदीश तुकाराम मुळीक यांच्यावर 4,956 मतांनी विजय मिळवला होता. तर 2014 च्या निवडणुकीत वडगाव शेरी मतदारसंघातून भाजपचे जगदीश मुळीक यांनी 66,908 मतांची आघाडी घेत मोठा विजय मिळवला होता.

त्यानंतर 2019 मध्ये वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात भाजपची वाट सुकर होईल, असे वाटत होते. मात्र अजितदादांनी सुनील टिंगरे यांच्यावर विश्वास दाखवला आणि राष्ट्रवादीची उमेदवारी दिली. टिंगरे यांना 97 हजार 700 मते, तर भाजपचे उमेदवार जगदीश मुळीक यांना 92 हजार 727 मते मिळाली. त्यामुळे टिंगरे यांनी 4 हजार 975 मतांनी निसटता विजय मिळवत वडगावशेरीत घड्याळावर विजय मिळवला होता.

महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीची संधी पाहून भाजपमध्ये असलेले माजी आमदार बापू पठारे आणि त्यांचा मुलगा सुरेंद्र पठारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. येथे शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली त्यानंतर त्यांचा सामना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्याशी झाला.

दरम्यान, आमदार टिंगरे यांचे कल्याणीनगर अपघात प्रकरणात नाव चर्चेत आले होते. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. मात्र अजित पवार यांनी टिंगरे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा उमेदवारी दिली होती.

आणखी संबंधित बातम्या

Pune MLC Election : पडद्यामागच्या हालचालींनी गड काबीज! वळसे पाटील यांच्या मध्यस्थीने काकडेंचा मार्ग मोकळा

2026-06-05 06:45:15

Pune MLC Election : पडद्यामागच्या हालचालींनी गड काबीज! वळसे पाटील यांच्या मध्यस्थीने काकडेंचा मार्ग मोकळा

Pune MLC Election : पिंपरी-चिंचवडला पुन्हा ठेंगा! राष्ट्रवादीकडून विक्रम काकडेंना उमेदवारी; निष्ठावंतांमध्ये तीव्र संताप

2026-06-02 02:15:33

Pune MLC Election : पिंपरी-चिंचवडला पुन्हा ठेंगा! राष्ट्रवादीकडून विक्रम काकडेंना उमेदवारी; निष्ठावंतांमध्ये तीव्र संताप

NCP Politics : मोठी बातमी ! पुण्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये बंडखोरी; विक्रम काकडेंनंतर शहराध्यक्ष सुनील टिंगरेंनीही भरला अर्ज

2026-06-01 17:17:51

NCP Politics : मोठी बातमी ! पुण्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये बंडखोरी; विक्रम काकडेंनंतर शहराध्यक्ष सुनील टिंगरेंनीही भरला अर्ज

Vidhan Parishad election : विधानपरिषदेच्या जागेवर राष्ट्रवादीचाही दावा; भाजपचा गेम बिघडवणार? उद्या होणार अंतिम फैसला

2026-05-25 06:30:14

Vidhan Parishad election : विधानपरिषदेच्या जागेवर राष्ट्रवादीचाही दावा; भाजपचा गेम बिघडवणार? उद्या होणार अंतिम फैसला

Bapusaheb Pathare : बैठका, पाच वेळा पाहणी करूनही कामे नाहीत; लोहगावातील मुख्य रस्त्यांबाबत आमदार पठारे यांचा आंदोलनाचा इशारा

2026-02-25 09:04:28

Bapusaheb Pathare : बैठका, पाच वेळा पाहणी करूनही कामे नाहीत; लोहगावातील मुख्य रस्त्यांबाबत आमदार पठारे यांचा आंदोलनाचा इशारा