Deepotsav in Ayodhya: एकावेळी उजळले 25 लाख 12 हजार दिवे; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Deepotsav in Ayodhya: अयोध्या दीपोत्सवाच्या निमित्ताने गिनीज बुकमध्ये दोन विक्रमांची नोंद झाली. 1121 जणांनी एकत्रितपणे सरयू महाआरती केली. यासह एकाचवेळी 25 लाख 12 हजार 585 दिवे प्रज्वलित करण्यात आले. प्रथमच 1121 वेदाचार्यांनी एकत्रितपणे सरयू मैय्याची आरती केली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही बुधवारी संध्याकाळी सरयू घाटावर गंगामातेची आरती केली. 1121 वेदाचार्य एकाच रंगाचे कपडे परिधान करून सरयू मैय्याची आरती एकाच आवाजात करत होते. आरती आणि दिपोत्सव यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घेतली आहे.

रामललाच्या अभिषेकनंतरच्या दीपोत्सवात रामनगरीत उत्साहाचे वातावारण होते. त्रेतायुग परत आल्यासारखे वाटत आहे. हा सण म्हणजे श्रद्धा आणि भक्ती व्यक्त करण्याची अनोखी संधी असल्याची भावना उपस्थित व्यक्त करीत होते. या उपक्रमाबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या योगदानाचेही कौतुक करण्यात आले.

