Deepika Padukone: ‘मेटा एआय’चा नवा आवाज बनली दीपिका पदुकोण ; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Deepika Padukone: बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पदुकोण आता ‘मेटा एआय’ची नवी आवाज बनली आहे. तिने स्वतःच्या इंस्टाग्राम पेजवर एक खास व्हिडिओ शेअर करत ही आनंदवार्ता दिली. दीपिकाच्या या नव्या यशामुळे तिचे चाहते प्रचंड खुश झाले असून, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
दीपिकाचा व्हिडिओ झाला व्हायरल
दीपिका पदुकोणने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात ती सांगते, “मी मेटा एआयची नवी आवाज आहे. तुम्ही तयार आहात का?”
या व्हिडिओमध्ये दीपिका वेगवेगळे आवाजाचे नमुने (सॅम्पल्स) रेकॉर्ड करताना दिसते. तिने हा संपूर्ण अनुभव खूप एन्जॉय केल्याचेही सांगितले.
चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
दीपिकाच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी उत्साहाने प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले, “ही खूप मोठी गोष्ट आहे!” तर दुसऱ्याने म्हटले,”नवा दिवस, नवी कामगिरी!”
अनेकांनी तिच्या आवाजाचे कौतुक करत “तुझा आवाज अतिशय सुंदर आहे” असे कमेंट्स केले आहेत.
दीपिकाच्या आगामी चित्रपटांविषयी
सध्या दीपिका पदुकोण शाहरुख खानसोबत ‘किंग’ या अॅक्शन चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात शाहरुखची मुलगी सुहाना खानही भूमिका साकारत आहे.
तसेच दीपिका दक्षिणेतील सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबतही एका नव्या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अॅटली करत असून, चित्रपटाचे नाव ‘AA22xA6’ असे ठेवण्यात आले आहे.
दीपिकाच्या या नव्या यशामुळे तिचे चाहते भारावले असून, ती पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.





