मुंबई – बॉलीवूडमधील फ्रॅंट रनर आणि स्टाइल आयकॉन दीपिका पदुकोणने लौकिकार्थाने आतापर्यंत बरेच यश कमावले आहे. त्यात आता आणखीन एक भर पडली आहे. फिल्म आणि टीव्हीच्या विश्वातून आशिया खंडातून सर्वांत प्रभावशाली व्यक्ती म्हणून तिची निवड करण्यात आली आहे.
ब्रिटनमधील गाला इंटरनॅशनलने सोशल मीडियावरून केलेल्या सर्वेक्षणामध्ये दीपिकाला निवडण्यात आले आहे. सोशल मीडिया फॉलोईंग,
गुगल सर्च आणि मीडिया मेन्शन यासारख्या वेगवेगळ्या श्रेणींमध्ये हे सर्वेक्षण घेण्यात आले होते. या सर्व श्रेणींमध्ये जगातील सर्वात प्रभावशाली महिलांची यादी तयार करण्यात आली आहे.
संगीत, टीव्ही आणि फिल्म, ब्युटी, राजकारण, बिजनेस आदी विविध क्षेत्रातील 100 देशांमधील अग्रगण्य महिलांची यादी करण्यात आली आहे. त्यामध्ये टीव्ही आणि फिल्म क्षेत्रात दीपिका पदुकोण सर्वांत प्रभावशाली व्यक्ती ठरली आहे.
तिला सोशल मीडियावर 139 फॅन फॉलोईंग मिळाले आहेत. इन्स्टाग्रामवरील एंगेजमेन्ट रेट, ट्विट, गुगल रिसर्च आणि अन्य मीडिया मेन्शन्समध्ये दीपिकाला मिळालेली प्रतिक्रिया आशिया
खंडातील टीव्ही आणि फिल्म उद्योगातील अन्य महिलांपेक्षा सर्वात अधिक आहे. अरियाना ग्रॅन्ड, किम कार्दशियां, एडेल आणि सेलेन डायोन या सेलिब्रिटींच्या रांगेत ती जाऊन बसली आहे.