Deepfake Video Issue: “36 तासांत डीपफेक व्हिडीओ हटवा, नाहीतर…” ; केंद्र सरकारचे व्हिडीओ अपलोड करणाऱ्यांना कडक इशारा

Updated On:
Deepfake Video Issue: “36 तासांत डीपफेक व्हिडीओ हटवा, नाहीतर…” ; केंद्र सरकारचे व्हिडीओ अपलोड करणाऱ्यांना कडक इशारा

Deepfake Issue India: काही दिवसांपूर्वी साऊथची अभिनेत्री रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandanna) एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आणि तेव्हापासूनच एकच खळबळ उडाली. त्यातच आता या डिपफेक व्हिडीओ (Deepfake Video) प्रकरणी केंद्र सरकारने कठोर पावले उचलली आहेत. “येत्या 36 तासांत फेसबुक, गुगल आणि युट्युबवरुन डीपफेक व्हिडीओ हटवा, अन्यथा कारवाईला सामोरं जा,” असा थेट इशारा केंद्र सरकारने डिपफेक व्हिडीओ अपलोड करणाऱ्यांना दिला आहे.

डीपफेक व्हिडीओ प्रकरणी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी, “फेसबुक, गुगल आणि यूट्यूबनं त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून डीपफेक व्हिडीओ हटवले नाहीत, तर कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही. डीपफेकचा गंभीर धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारनं 24 नोव्हेंबर रोजी सर्व ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली आहे. यावेळी डीपफेक व्हिडीओंवर तात्काळ कारवाई करण्यासाठी सांगितलं जाईल. तसेच, पुढे अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजनांबाबतही चर्चा होईल.”असे त्यांनी म्हटले.

तसेच केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी,”ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे सांगितलं. यामुळे भारतातील लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ शकतो. देशातील कोट्यवधी इंटरनेट युजर्ससाठी हा एक गंभीर धोका आहे. त्यामुळे केंद्र सरकार हे प्रकरण गांभीर्याने घेत आहे. यावर पुढे बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, ऑनलाईन प्लॅटफॉर्म युजर्सना सुरक्षित वातावरण देण्यासाठी चेतावणी देण्यात आली आहे. हे माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यांतर्गत येतं आणि जर ऑनलाईन प्लॅटफॉर्म तसं करू शकत नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते. भारतीय कायद्यांमध्ये हे स्पष्ट आहे की, त्यांच्या युजर्सनी शेअर केलेल्या कंटेंटवर दिलेली सूट रद्द केली जाईल” असेही त्यांनी यावेळी सांगितले.

त्यासोबतच कोणत्याही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर डीपफेक व्हिडिओ अपलोड झाल्यास तो 36 तासांच्या आत काढून टाकण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री म्हणाले. जर डीपफेक व्हिडिओ 36 तासांच्या आत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून हटवले नाहीत तर संबंधित व्यक्ती न्यायालयात जाऊ शकते आणि असे करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी खटला सुरू केला जाऊ शकतो. राजीव चंद्रशेखर म्हणाले की,” या कालावधीत डीपफेक व्हिडिओ काढून टाकले नाहीत तर ऑनलाइन प्लॅटफॉर्म देखील कारवाईच्या कक्षेत येतील.” असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

2026-10-08 23:30:43

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

2026-10-08 18:11:06

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

2026-10-08 17:15:33

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

2026-10-08 16:41:41

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

K. T. Rama Rao : ‘स्टारलिंक’ रोखणाऱ्यांची नावे जाहीर करा; मस्क यांच्या आरोपांनंतर के. टी. रामाराव यांची मागणी

2026-10-08 16:18:58

K. T. Rama Rao : ‘स्टारलिंक’ रोखणाऱ्यांची नावे जाहीर करा; मस्क यांच्या आरोपांनंतर के. टी. रामाराव यांची मागणी