मुंबई – एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते दीपक केसरकर यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, संजय राऊत हे आज केवळ शरीराने शिवसेनेत असले तरी त्यांचे मन मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्येच आहे. त्यामुळेच सध्या ते अशी वक्तव्ये करीत असावेत असे मतही त्यांनी व्यक्त केले.
केसरकर म्हणाले की, ही काही टीका नाही पण ते सध्या ज्या प्रकारचे वर्तन करीत आहेत तसे त्यांनी करू नये. ते म्हणाले की, आम्ही भाजप-शिवसेना यांच्यात झालेल्या युतीनुसार लोकांकडे मते मागितली होती. लोकांनी आमच्या युतीला सत्ता दिली होती पण पुढे आम्ही लोकांनी नाकारलेल्या पक्षांशी आघाडी केली आणि ते लोक शिवसेनेमुळे पुन्हा सत्तेत आले. असे व्हायला नको होते.
पुढे ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या सोबत सध्या आमची जी दरी निर्माण झाली आहे ती येत्या काळात भरून निघेल असा विश्वासही त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.