आकुर्डी : दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार…., शुभम करोति कल्याणम आरोग्यम् धनसंपदा…., दीप ज्योती.., नमोस्तुते नमोस्तुते.., बालचमुच्या बोबड्या बोलातील दीप पूजनाच्या मनोभावे प्रार्थनाने दीप अमावस्येच्या प्रसंगी बालक मंदिर उजळून निघाले निमित्त होते “नवनगर शिक्षण मंडळ”, आकुर्डी संचलित “श्री सरस्वती बालक व प्राथमिक विद्यामंदिर या शाळेतील आषाढी अमावस्या अर्थात दीप अमावस्येचे… दर्श अमावस्या निमित्त सरस्वती बालक मंदिरात नवनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक प्रा.गोविंदराव दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, सरस्वती प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजू माळे, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत “दीपपूजनाचा कार्यक्रम” मोठ्या उत्साहात पार पडला. बालवाडी विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने दिवे रंगवून, दिव्यांची आकर्षक फुलांनी सजावट करून दीप प्रज्वलन केले. यावेळी दीपपूजनाचे पूजनाचे महत्त्व व माहिती, परंपरा सांगण्यात आली. पालक प्रतिनिधी भाग्यश्री सोनुने, सोनाली पाटील, सखू पखाले, अनिल कुमार, अर्चना सूर्यवंशी, सोनल जाधव, बालवाडी विभागाच्या शिक्षिका स्वाती पाटील-जाधव सुनिता गीते, शांता हराळे, सविता राठोड, विनोद गोयर इतर शिक्षक कार्यक्रमास उपस्थित होते.