#Video : नारायणगावात साबिर-विठाई कुंज उद्यानाचे लोकार्पण

Updated On:
#Video : नारायणगावात साबिर-विठाई कुंज उद्यानाचे लोकार्पण

नारायणगाव(प्रतिनिधी) – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनाच्या निमित्ताने नारायणगाव ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, उपसरपंच पुष्पाताई आहेर, ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांच्या कल्पनेतून साकारलेल्या साबिर-विठाई उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात आई-वडील यांच्यासमवेत लहान बाल गोपाळांची उपस्थिती होती.

नारायणगाव ग्रामपंचायतीने लहान मुलांसाठी निर्माण केलेल्या साबिर-विठाई उद्यानाची रचना अतिशय सुंदर असून लहान मुलांना खेळण्यासाठी विविध रंगात खेळाचे साहित्य उपलब्ध करून दिले आहे. उद्यानाची निर्मिती करताना मनाला भुरळ पाडणारी रंगांची उधळण व झाडांची लागवड केलेली आहे. त्यामुळे उद्यानात गेल्यानंतर अतिशय समाधान व मनाला आनंद वाटतो.

नारायणगावच्या नावलौकिकात भर घालणारे साबीर शेख व तमाशा कलावंत विठाबाई यांची नावं उद्यानाला देण्यात आली आहे. या लोकार्पण सोहळ्यास दोन्ही मान्यवर कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. स्वप्निल धामणे यांनी गार्डनचे डिझाईन तयार केले असून प्रकाश निमसे यांनी बांधणी केली आहे.

संदीप औटी व शिवा खोकराळे यांनी उद्यानात झाडांची निवड करून त्याची लागवड केली आहे. यावेळी कार्यक्रमास कै.साबीर शेख व तमाशा कलावंत कै. विठाबाई यांच्या कुटुंबातील कैलास व राजेश नारायणगावकर, मालती इनामदार, सिद्दिक शेख, अबित शेख, सरपंच योगेश पाटे, उपसरपंच पुष्पाताई आहेर, ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे, कार्यकारी अभियंता सुभाष भुजबळ, अशोक गांधी, डॉ. सदानंद राऊत, बाळासाहेब पाटे, संजय वारुळे, जंगल कोल्हे, डी.व्ही.ताजवे,ग्रामपंचायत सदस्य अरीफ आतार, गणेश पाटे, राजेश बाप्ते, संतोष दांगट, राजेश रत्नपारखी, शरद दरेकर, अजित जाधव, विकास तोडकरी, अजित वाजगे, संतोष पाटे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणखी संबंधित बातम्या

Narayangaon : विसर्जन मिरवणुकीत देखाव्यांनी जिंकली नागरिकांची मने

2026-09-27 07:56:56

Narayangaon : विसर्जन मिरवणुकीत देखाव्यांनी जिंकली नागरिकांची मने

Pune District : नारायणगावच्या प्रवेशद्वारावरील कचरा हटविला

2026-09-25 07:59:14

Pune District : नारायणगावच्या प्रवेशद्वारावरील कचरा हटविला

Narayangaon : द्राक्ष, मनुके व सुकविलेल्या फळांच्या आयातीवर कठोर निर्बंधांची गरज

2026-09-25 07:54:50

Narayangaon : द्राक्ष, मनुके व सुकविलेल्या फळांच्या आयातीवर कठोर निर्बंधांची गरज

Pune District : मीना नदीकाठचा कचरा हटविला

2026-09-23 08:21:05

Pune District : मीना नदीकाठचा कचरा हटविला

Narayangaon : कुबेर अंगण गणेश मंडळाचा ग्रामवैभव देखावा

2026-09-19 08:24:01

Narayangaon : कुबेर अंगण गणेश मंडळाचा ग्रामवैभव देखावा