वाहन विक्रीत घट; टाटा मोटर्सचा नफा झाला कमी
Updated On:

नवी दिल्ली – तिसर्या तिमाहीत टाटा मोटरचा नफा 9.9 टक्क्यानी कमी होऊन 3,450 कोटी रुपये झाला आहे. शहरी भागातील क्रयशक्ती कमी झाल्यामुळे वाहन विक्रीत घट होत असल्याचे बोलले जाते. याचा परिणाम या कंपनीच्या ताळेबंदावर झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहित कंपनीला 3,832 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
ओला इलेक्ट्रिक
इलेक्ट्रिक वाहन निर्माण करणारी ओला इलेक्ट्रिक मोबयालिटी या कंपनीला दुसर्या तिमाहित 495 कोटी रुपयांचा तोटा झाला. गेल्या वर्षी दुसर्या तिमाहीत कंपनीला 524 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. हा तोटा कमी करण्यात यश मिळत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.





