शिवाजीनगर, कोथरुड आणि कसबा मतदारसंघाचा समावेश
पुणे – विधानसभा निवडणुकीत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती होणार की नाही याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसला तरी दोन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहेत. वंचित आघाडीने मंगळवारी 22 उमेदवारांची यादी जाहीर केली. यात पुण्यातील कसबा, शिवाजीनगर आणि कोथरुड या 3 मतदारसंघांचा समावेश आहे.
एमआयएमनेसुद्धा गेल्या आठवड्यात 4 उमेदवार जाहीर केले होते. त्यात कॅन्टामेंटमधून हिना शफीक मोमीन यांना उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर वडगावशेरीमधून डॅनियल लांडगे यांना उमेदवारी दिली आहे. तर, वंचित बहुजन आघाडीने पुण्यातील कसबा-मिलिंद काची, कोथरुड-दीपक नारायण शमदिरे आणि शिवाजीनगर-अनिल शंकर कुऱ्हाडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. याशिवाय भोसरी- शहानवाला जब्बार शेख यांना उमेदवारी दिली आहे.
तसेच, शिराळा, कराड, दक्षिण इस्लामपूर, पाथर्डी, कर्जत, जामखेड, औसा, ब्रम्हपुरी अशा इतर मतदार संघांतील उमेदवारही जाहीर केले आहेत.