उंडाळेत बेमुदत लॉकडाऊनचा निर्णय

कराड  -कराड तालुक्‍यात करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कराड दक्षिणेतही करोनाचा प्रादूर्भाव वाढला आहे. ज्या गावात करोनाचा शिरकाव नव्हता अशा उंडाळे गावात 21 जण करोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर साळशिरंबे, टाळगाव, सवादे, जिंती यासह गावात करोना रुग्ण वाढत असल्याने उंडाळे गाव पूर्णता बेमुदत लॉकडाऊन करण्याचा निर्णय करोना कमिटीने घेतला आहे.

कराड दक्षिणेत सर्वात प्रथम महारुगडेवाडी येथे करोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्याचा मृत्यूही झाला. त्यानंतर विभागात करोनाचा प्रसार रोखण्यात यश आले. पण इतरत्र करोनाचा प्रसार वाढल्यामुळे ग्रामीण भागातही प्रसार वाढू लागला. डोंगरी भागात मात्र मुंबई पुण्याहून आलेल्या प्रवाशी व ट्रॅव्हल हिस्ट्रिमुळे ग्रामीण भाग करोनाने व्यापून टाकला आहे.

उंडाळे विभागात ओंड येथे 40 लोकांना करोनाची बाधा झाली आहे. तर 3 जणांचा मृत्यू झाला. जिंती येथे 2 जणांना बाधा झाली. सवादे येथे एकाचा मृत्यू तर 6 जणांना बाधा झाली आहे. येळगाव येथे 32 पेक्षा अधिक लोकांना करोनाची बाधा झाली असून उंडाळे येथे 21 जण पॉझिटिव्ह आहेत. टाळगाव येथे एकजण बाधित असून ओंडोशी येथे 1चा मृत्यू तर 6 जणांना बाधा झाली आहे.

साळशिरंबे येथे दोघांना बाधा झाली आहे तर काले सारख्या मोठ्या गावात 1चा मृत्यू तसे 27 लोकांना बाधा झाली आहे. तुळसण येथील साथ आटोक्‍यात आली पण 38 लोकांना बाधा होऊन बरे झाले. म्हासोली येथील साथ आटोक्‍यात आली असून येथेही 38 जणांना बाधा झाली होती. येवती येथेही 12 ते 15 लोकांना करोनाची लागण झाली. भरेवाडीत करोनाचा शिरकाव झाला. या वाढत्या संसर्गामुळे उंडाळेत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.