Deccan Gymkhana Cricket League 2024 :- डेक्कन जिमखाना क्लबच्या वतीने आयोजित नहुश जाधव पुरस्कृत अनिल जी.रानडे मेमोरियल डेक्कन जिमखाना क्रिकेट लीग 2024 स्पर्धेत अंतिम फेरीत नहूश जाधवच्या नाबाद 48 धावांच्या खेळीच्या जोरावर वुल्व्हस संघाने शार्क्स संघाचा पराभव करून विजेतेपद संपादन केले. या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रथम फलंदाजी करताना शार्क्स संघाने 7 षटकांत 5 बाद 66 धावा केल्या. यात प्रसाद जाधव 19, अंकुश जाधव 18, पराग चोपडा 16 यांनी धावा केल्या. वुल्व्हसकडून प्रतीक वैद्य(2-16), आनंद परचुरे(1-11), ऋषभ गादिया(1-7) यांनी सुरेख गोलंदाजी करत शार्क्स संघाला 66 धावांवर रोखले. हे आव्हान वुल्व्हस संघाने 6 षटकांत 1 बाद 67 धावा करून पूर्ण केले. यात नहूश जाधवने 20चेंडूत 4चौकार व 3 षटकारासह नाबाद 48 धावा काढून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला प्रतीक वैद्यने नाबाद 11 धावा काढून साथ दिली. स्पर्धेतील विजेत्या वुल्व्हस संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. क्रिकेट कॉर्नर : आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी…. निकाल : अंतिम फेरी: शार्क्स: 7 षटकांत 5 बाद 66 (प्रसाद जाधव 19, अंकुश जाधव 18; प्रतीक वैद्य 2-16, आनंद परचुरे 1-11, ऋषभ गादिया 1-7) पराभुत वि.वुल्व्हस: 6 षटकांत 1 बाद 67 (नहूश जाधव नाबाद 48, प्रतीक वैद्य नाबाद 11; आदित केंभवी 1-18); सामनावीर – नहुश जाधव.